मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast) podcast artwork
Society & Culture

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

by Vatvatkaar
Share this ranking Claiming needs an RSS feed. Contact us.

Chart positions today · Mexico

Not on the Mexico charts we track today.

If you like मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot…, try…

Latest episodes

  • S3.E03 इकिगाई: समाधानी आयुष्याचा गुरुमंत्र

    June 18, 2023 · 46 min

    वत्सा, तुला काय पाहिजे तो वर माग असं विचारलं तर बिनधास्त "इकिगाई" ची डिमांड करावी. समोर मांडून ठेवलेल्या या आयुष्याच्या पसाऱ्यात समाधान कशात शोधायचं? अशा या क्लिष्ट वाटणाऱ्या प्रश्नाचं जपानी लोकांनी शोधलेलं साधं उत्तर म्हणजे "इकिगाई"…

  • S3.E02 काय हवं? चहा की कॉफी?

    June 11, 2023 · 31 min

    चहा, कॉफी किंवा त्यापेक्षा अधिक उत्तेजक पेयांबद्दल (आणि तत्सम सवयींबद्दल) केलेला हा खल ! असं करता करता आम्ही चीन, जपान, मकाऊ आणि ध्यान-धारणा वगैरे ठिकाणहून चक्कर मारून परत एक-एक कप च्या प्यायला मूळपदावर परतलो #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

  • S3.E01 सरकार पुरस्कृत चोरी?

    June 4, 2023 · 38 min

    तुम्ही आत्तापर्यंत काही देशात सुरु असलेला सरकारपुरस्कृत दहशतवाद ऐकला असेल. पण एक असा नमुनेदार देश आहे जो चक्क (डिजिटल) चोऱ्या / डाके / वाटमाऱ्या करण्यात अगदी निष्णात झाला आहे. ऐका त्याची ही डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट जी पाहता पाहता आपल्या…

  • तिसऱ्या सत्राची नांदी

    May 30, 2023 · 1 min

    थोडा आळस, काही महत्तवाची कामं व वाढते व्याप यात जरा व्यस्त झाल्यामुळे दुसऱ्या सत्रानंतर आम्ही जरा थंडावलो, पण थांबलो मुळीच नाही… येत आहोत लवकरच तुमच्या भेटीला तिसऱ्या सत्रात नवनवीन विषय घेऊन

  • S2.E11 - दुसऱ्या सत्राची सांगता... लवकरच पुन्हा भेटू

    March 27, 2022 · 41 min

    चला तर मग मेतकुटच्या दुसऱ्या सत्राची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या सत्राप्रमाणेच याही सत्रात साथ दिल्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद. यावेळी आमच्याबरोबर आपापल्या क्षेत्रात पारंगत, आपापल्या विषयांवर प्रेम करणारी आमची काही मित्रमंडळी…

Show 7 more episodesShow fewer episodes
  • S2.E10 - अर्थ नियोजनाची शर्थ - शैलेश आणि ऋजुता बरोबर गप्पा

    March 20, 2022 · 1 hr 54 min

    आता बघा, असं आहे की, सगळी सोगं आणता येतात, पण पैश्याचं सोंग आणता येत नाही. मग कमाई आणि खर्च यांचा ताळमेळ करताना भविष्याच्या गरजांचा विचार पुरेसा होतो का? पैसा साठवणे आणि गुंतवणे यातला फरक काय? घराचा EMI, मुलांचं शिक्षण, मौजमजा यांत…

  • S2.E9 - जय जय मनी!

    March 13, 2022 · 52 min

    देशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली…

  • S2.E8 - फ्रॉड अणि फसवणूक... रिश्ता वही, सोच नई

    March 6, 2022 · 1 hr 9 min

    जमाना बदल गया, लोग बदल गए, नव्या तंत्रज्ञानाबरोबर, नव्या प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या सुद्धा सुरु झाल्या. पूर्वी घरफोडी व्हायची तशी सध्या क्रिप्टो चोरी होऊ शकते. म्हणजे चोर सुद्धा वर्क फ्रॉम होम करू शकतात. अशाच प्रकारच्या काही नव्या जुन्या…

  • S2.E7 - Fourier Transform, Inventions and Passion

    February 27, 2022 · 1 hr 28 min

    शाळा कॉलेजमध्ये धो धो शिकून पुढे कॉर्पोरेट कल्चर मध्ये घुसल्यानंतर धक्का बसल्यासारखं होतं का? कोणत्या गोष्टी बदलतात? कोणत्या गोष्टी आधीच माहिती असत्या तर बरं झालं असतं असं वाटतं? कधी हा विचार मनात येतो का की आपल्याकडे व्हाट्सऍप, फेसबुक…

  • S2.E6 - आज खानेमें क्या है? - प्रीती आणि राजेश सोबत गप्पा

    February 20, 2022 · 2 hr 6 min

    अन्न हे पूर्णब्रह्म, असं ऐकत आपण सगळे मोठे झालो. पण या देवासमान अन्नामध्ये दडलेल्या तेहेतीस कोटी छटा यांची ओळख कधी बरं झाली? भारताबाहेर पडल्यावर, भारतीय जेवण म्हणजे पंजाबी जेवण अशा ओळखींमधून बाहेर येता येता आपण दक्षिण भारतीय जेवणाच्या…

  • S2.E5 - वाचाल तर वाचाल - विनायक रानडे यांच्यासोबत गप्पा

    February 13, 2022 · 2 hr 8 min

    आपण 'ऑनलाईन' जगात नेहेमी 'कनेक्टेड' राहतो असं आपल्याला वाटतं. पण आपल्या जवळच्या माणसांच्या वाढदिवसाची आठवण करून देण्यासाठी, "हे पुस्तक/विडिओ/ सिनेमा/गाणे  तुला आवडू शकेल' असं सांगण्यासाठी आणि अगदी घरपोच आणून देण्यासाठी सुद्धा आपण चेहरा…

  • S2.E4 - बातम्यांच्या महापुरात ... आशिष दीक्षित बरोबर

    February 6, 2022 · 2 hr 13 min

    लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे प्रसारमाध्यमं. हा विषय इतका महत्वाचा असला तरी आपण या चौथ्या स्तंभाला किती गंभीरतेने घेतो? आपणच कशाला? पत्रकारितेमध्ये असलेले लोक याला किती गंभीरतेने घेतात? प्रेक्षकवर्गात बसून आपल्याला सर्वाना हे प्रश्न पडत…

Full episode archive on Apple Podcasts →

About the show

वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा. मराठी पॉडकास्ट | Marathi Podcast वटवटकार: सागर, पराग आणि रोहित लोगो: राजेश गोडे #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #म #गप्पा #पॉडकास्ट #marathi